परदेशातील शिक्षणाच्या संधी

 • strict warning: Non-static method view::load() should not be called statically in /home/karkiorg/public_html/sites/all/modules/views/views.module on line 879.
 • strict warning: Declaration of views_handler_filter::options_validate() should be compatible with views_handler::options_validate($form, &$form_state) in /home/karkiorg/public_html/sites/all/modules/views/handlers/views_handler_filter.inc on line 589.
 • strict warning: Declaration of views_handler_filter::options_submit() should be compatible with views_handler::options_submit($form, &$form_state) in /home/karkiorg/public_html/sites/all/modules/views/handlers/views_handler_filter.inc on line 589.
 • strict warning: Declaration of views_ticker_style_plugin::options() should be compatible with views_object::options() in /home/karkiorg/public_html/sites/all/modules/views_ticker/views_ticker_style_plugin.inc on line 144.
 • strict warning: Declaration of views_plugin_row::options_validate() should be compatible with views_plugin::options_validate(&$form, &$form_state) in /home/karkiorg/public_html/sites/all/modules/views/plugins/views_plugin_row.inc on line 135.
 • strict warning: Declaration of views_plugin_row::options_submit() should be compatible with views_plugin::options_submit(&$form, &$form_state) in /home/karkiorg/public_html/sites/all/modules/views/plugins/views_plugin_row.inc on line 135.
 • strict warning: Non-static method view::load() should not be called statically in /home/karkiorg/public_html/sites/all/modules/views/views.module on line 879.
 • strict warning: Declaration of content_handler_field::options() should be compatible with views_object::options() in /home/karkiorg/public_html/sites/all/modules/cck/includes/views/handlers/content_handler_field.inc on line 208.
 • strict warning: Declaration of views_handler_filter_boolean_operator::value_validate() should be compatible with views_handler_filter::value_validate($form, &$form_state) in /home/karkiorg/public_html/sites/all/modules/views/handlers/views_handler_filter_boolean_operator.inc on line 149.
 • strict warning: Non-static method view::load() should not be called statically in /home/karkiorg/public_html/sites/all/modules/views/views.module on line 879.
 • strict warning: Declaration of views_plugin_style_default::options() should be compatible with views_object::options() in /home/karkiorg/public_html/sites/all/modules/views/plugins/views_plugin_style_default.inc on line 25.

परदेशात उच्च-शिक्षणासाठी जाणे, हे बहुतेक जिज्ञासु विद्यार्थ्यांचे ध्येय असते. साधनांची मुबलकता, मुलभुत सोयींचा विकास, शिक्षण-संशोधना साठी पोषक वातावरण, यासारखे मुद्दे त्यांचे मनात असतात. शहरातील विद्यार्थ्यांना याबद्द्ल माहिती मिळणे सहज शक्य होते, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशी माहिती मिळणे खुपच अवघड असते. म्हणुन, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना माहिती पुरवण्यासाठी हा प्रयत्न.

परदेशात शिक्षणासाठी दोन प्रकारे जाता येते.
१) शिक्षणाचा खर्च स्वतः भागवण्याची क्षमता असणे.
२) उत्कृष्ठ गुणांची अन अनुभवाची शिदोरी सोबत घेउन परकीय विद्यापीठाकडुन शिष्यवृत्ती मिळवुन.

पहिल्या प्रकारातील विद्यार्थी हे खुपच कमी असतील. ग्रामीण भागातील विद्यार्थी इतका मोठा खर्च पेलवु शकत नाही. शक्यतो, मोठे व्यापारी, अधिकारी अन राजकारणी ह्यांचीच मुले पहिल्या प्रकारात मोडतात.

दुसर्‍या प्रकारात आपली सर्वसामान्य विद्यार्थी असतील. त्यांनी कुठल्या देशात उच्च शिक्षणासाठी जायचे ते अगोदर निश्चित करावे. इंग्रजी भाषिक देश (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड) अन इतर देश (युरोपे, रशिया) असे दोन प्रकार लक्षात असु द्यावेत. कारण, इंग्रजी भाषिक देशात जाण्यासाठी टोफेल (http://www.ets.org/toefl) अन आईएलटीएस (http://www.ielts.org/default.aspx) सारख्या इंग्रजी भाषेच्या परिक्षा बंधनकारक असतात. (अनेक युरोपीय देशांत देखील आता अश्या परिक्षा बंधनकारक केल्या जात आहेत.) काही प्रकारच्या शिष्यवृत्यांसाठी जीआरई (http://en.wikipedia.org/wiki/Graduate_Record_Examination) सारख्या परिक्षा देखील द्याव्या लागतात. अश्या परिक्षांचा अभ्यास वेळीच सुरु करुन, पदवीनंतरचा वेळ वाया घालवणे टाळले जाउ शकते.

काही देश/विद्यापीठे पुर्ण शिक्षणखर्च/राहण्याचा खर्च भागेल इतकी शिष्वृत्ती देत नाहीत. अशा वेळी तेथे अर्ध-वेळ काम करण्याची परवानगी मिळते. अश्या वेळी तेथील भारतीय विद्यार्थी संघटना मदत करतात. परदेशात गेल्यानंतर अश्या संघटनांमध्ये सामील होणे नेहमीच मदतीचे असते. 'श्रमाला प्रतिष्ठा' या सुत्रावर परदेशातील जीवन पद्धती आधारलेली असल्याने कुठलेही काम हलके नाही, हे मनात ठेवावे. रेस्टॉरंट, दुकाने, फास्ट-फुड चेन, पेट्रोल पंप, इ. ठिकाणी कामे सहज मिळतात.

संशोधनासाठी परदेशात जाऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी पदवी सोबत, काही अनुभव देखील मिळवला पाहिजे, कि जेणेकरुन परदेशातील शिक्षण पद्धतीत आपण सहज वावरु शकतो. कारण, परदेशात पदवीच्या विद्यार्थ्याला त्याच्या विषयातील जो प्रत्यक्ष अनुभव असतो, तो आपल्याकडीन विद्यार्थ्याला नसतो, कारण आपली शिक्षण पद्धती प्रत्यक्ष अनुभवापेक्षा पुस्तकी ज्ञानाला अन मार्कांना जास्त महत्व देते.

आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, त्या क्षेत्रातील शोधनिबंध ज्या वैज्ञानिक नियतकालिकामध्ये प्रसिद्ध होतात, त्यातुन संशोधन संस्था अन त्यांचे विषय माहिती होउ शकतात. असे शोधनिबंध इंटरनेट वर देखील उपलब्ध असतात. त्यातुन, आपल्याला हव्या असलेल्या विषयाच्या संस्थेकडे/प्राध्यापकांकडे इ-मेल ने संपर्क करावा. तो करत असताना, आपल्या  अनु

भवाचा, शिक्षणाचा व्यवस्थित उल्लेख करावा. त्या संदेशाला आलेल्या उत्तरावर कार्यवाही करावी. इंग्रजी जर व्यवस्थित येत नसेल, तर एक दोन मित्रांशी सल्ला मसलत करुन अर्ज लिहावा अन मगच तो पाठवावा. इंग्रजी न येण्याचा न्युनगंड बाळ्गु नये, परंतु आपण लिहिलेला अर्ज समोरच्या संशोधकाला कळेल याची दक्षता घ्यावी. विनाकारन अवास्तव माहिती न देता, अन पुन्हा पुन्हा इ-मेल न पाठवता, संशोधन संस्थेच्या उत्तराची वाट पहावी. ही प्रक्रिया वेळ्खाऊ असते, त्यामुळे अर्ज करताना संयम राखणे उत्तम! संशोधन कार्याचे

मुळ स्वरूप सातत्याने अन संयमाने

काम करण्यातच

असते!

पासपोर्ट कसा काढावा? परदेशातील उपलब्ध संधींची माहिती कुठे मिळेल? परदेशात नोकरी ची संधी कुठे मिळेल? अश्या प्रशांना उत्तर देण्यासाठी इथे काही संकेतस्थळे दिली जातील. (आपल्याला माहिती असलेली संकेतस्थळे आम्हाला जरुर सुचवा.)

http://www.mea.gov.in

http://passport.gov.in/

http://www.spainexchange.com

 
 
 
 
 

विज्ञान आणि विशेषतः रसायन शास्त्रातील काही महत्वपुर्ण माहिती संकलीत केलेली संकेतस्थळे:

http://phoenix.tuwien.ac.at/chemistry/default.htm

http://www.czollner.at.tt/bookmarks.htm